माझ्याशी मैत्री कराल
काय , तुम्ही मला तुमचा एक क्षण द्याल ?
काय , तुम्ही माझे एक म्हणणे ऐकाल ?
जे आयुष्यभर कुणी लुटू शकणार नाही ,
असे एक नाते द्याल ?
जे कधीहि मिटणार नाही ,
असे एक नाव त्या नात्याला द्याल ?
जिचे कुणीहि मोल लाऊ शकणार नाही ,
अशी एक अमूल्य ठेव द्याल ?
आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात ,
थोडीशी जागा द्याल ?
वादळ वाटेवर माझ्या खांद्यावर राहील ,
असा हाथ द्याल ?
दुखात माझे अश्रू पुसेल ,
असा रुमाल बनणार ?
सुखात माझ्या होठांवर उमलून येईल ,
ते हास्य बनणार ?
माझे प्रत्येक गुपित हृदयात सामावून ठेवावे ,
असे माझे हमराज बनणार ?
काय , तुम्ही माझे दोस्त बनणार ?
काय , तुम्ही माझ्याशी मैत्री कराल ?
कवयित्री - अर्चना सोनाग्रे
कवयित्री - अर्चना सोनाग्रे
Comments
Post a Comment