ना पाहले मी तुला , ना पाहले तू मला

ना पाहले मी तुला , ना पाहले तू मला 
तरी हे रेशीम बंध कसे जुळुनी आले !
अनोळखी असून एकमेकांसाठी 
एकाच धाग्यात गेलो कसे गुंफले !
ऐकले होते कधीतरी , ते आज पटून आले 
नाती जुळतात आकाशी , नाही इथे .
नाहीतर कुठे तू ? कुठे मी ?
कशाचाच इथे ताळमेळ नाही .
ना पाहता देखता स्वरात तुझ्या मी गुंतले .
विश्वासाने एक एक रहस्य तुझ्याजवळ उलगडले .
तू हि दरवेळी माझ्या भावूकतेला जपले .
तुझे ते माझ्यावर अधिकार गाजवणे ,
कधी हक्काने रागावणे , मला गोडी लावतं
माझ्या मनाची , व्यथेची काळजी घेणारं 
तुझ मन मला वेड लावतं .
त्या वेदातही यशस्वी भविष्य दिसतं .
माझ्या प्रेमाला प्रांजळतेची दक्षिणा देणारं सुख भेटतं .

कवयित्री - अर्चना सोनाग्रे 

Comments