चारोळी
* प्रेमाची तहानलेली , व्याकूळ ,
मी एक सागरी किनारा आहे .
तुझीच वाट पाहत मी ,
पावसासाठी तळमळणाऱ्या
चातकाची सोबतीण आहे .
* प्रेमाचा अर्थ तू जाणला नाहीस ,
हृदयाची गोष्ट तू ऐकली नाहीस .
घडता घडता सारे घडून आले ,
पण तू तुझ्या जगाचा हलला नाहीस .
* लुक लुक्तात चांदणे आकाशात ,
रात्रीच्या अंधारात .
तरंगतात शैवाल समुद्रतळावर ,
खाडीच्या भागात .
जन्मतात कविता यांना अनुभवून ,
माझ्या मनात .
रंगतात स्वप्न माझी तेव्हा ,
तुझ्या विचारात .......
कवयित्री - अर्चना सोनाग्रे
Comments
Post a Comment