का कुणी कुणाच्या प्रेमात पडतं ?
का कुणी कुणाच्या प्रेमात पडतं ?
स्वतःच कुऱ्हाडीवर पाय मारून घेतं ?
का कुणी कुणाच्या प्रेमात पडतं ?
स्वतःला घायाळ अन सोबत्यांना उदास करतं ,
डोळ्यात गंगा अन डोक्यात वादळ निर्माण करतं !
खालीपणाची भावना साऱ्या वातावरणात आणतं .
का कुणी कुणाच्या प्रेमात पडतं ?
संध्या काळच्या वेळी हे सारं अधिकच जाणवतं ,
सारखं कुणाचं तरी कमित्व वाटतं .
पण त्याला नाही कदर हे मन विसरत .
का कुणी कुणाच्या प्रेमात पडतं ?
कवयित्री - अर्चना सोनाग्रे
Comments
Post a Comment