एक सुंदर मूर्ती
एक सुंदर मूर्ती माझ्या मनात बसलेली ,
रात्री स्वप्नात येऊन जागवणारी ,
दिवसा विचारात येऊन हसवणारी ,
कसलाच संबंध नसतांना ,
जन्मो जन्मीचे नाते सांगणारी ,
मनात काहीतरी गुपित जपणारी ,
कशाचेतरी सतत चिंतन करणारी ,
त्याच्या आवाजाची मोहकता अंतकरणाला भिडून जाणारी ,
प्रेमळपणाने सर्वांना आपलेसे करणारी ,
माझ्या भावनांना समजून घेणारी .
दूर असूनही जवळच वाटणारी ,
माझ्या गप्पांमध्ये रमणारी ,
आज प्रत्यक्षात अवतरली ,
अगदी तशीच , माझ्या हृदयात जशी .
गोपिकांच्या गोपाळा सारखी ,
मीरेच्या घनशामा सारखी ,
शबरीच्या राम सारखी ,
राधेच्या क्रिष्णा सारखी ,
भेट होणार नाही कधी ,
हे माहित असूनही ,
मनात एक आस जागवणारी ,
माझी सावळी हरी मूर्ती !
कवयित्री - अर्चना सोनाग्रे
Comments
Post a Comment