तिचे पाणावलेले डोळे
तिच्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडांनी
लेखिका अर्चना सोनाग्रे
मला खूप काही शिकवले ,
प्रत्येक व्यथेला हृदयात दडवणे ,
अन ओठांवर आनंदच आणणे ,
मला तिचे ध्येयचं वाटले .
मनात तिच्या दाटला होता असंख्य यातनांचा पूर ,
पण तिने त्यांना अश्रूद्वारे दिली नाही वाट ,
अन पुरला आपल्या अंतकरणात खेचले .
अशाप्रकारे डोळ्यात आलेल्या पाण्याला कडांनी थांबवून घेतले .
तिच्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडांनी
मला खूप काही शिकवले ,लेखिका अर्चना सोनाग्रे
so nice
ReplyDeletethankyou mama
ReplyDelete