गारवा
गारवा वाढलाय हवेत ,
जो मला नेहमीच हवाहवासा असतो ,
मला वेडे करून सोडतो ,
अन तुझ्याजवळ येण्याची ओढ लावतो ,
सख्या रे दुरावा सहन होत नाही ,
तुझ्या स्मरणाने ओठांची उमललेली कळी ,
मिटू पहातच नाही ,
त्यात गालांवर चढलेली लाली ,
आईच्या नजरेतून सुटत नाही ,
काय बहाणा सांगू तिला ,
हे मलाही सुचत नाही ............!
Comments
Post a Comment