चारोळी

*ते क्षण किती सुंदर असतील ,
जेव्हा माझी स्वप्न पूर्ण होतील .
पुस्तकाच्या पानावरच सही ,
पण पूर्ण तर होतील !

*हृदयाच्या इतक्या दुरही जाऊ नकोस कि ,
हृदयाचा आवाजही अनोळखी होईल ,
इतरांमध्ये इतकाही गुंतू नकोस कि ,
आप्तांची ओळख पटनेही कठीण होईल !

*वाटतं चंद्र ताऱ्यांमध्ये हरवून जावे ,
तुझ्या आठवणीत सारेच विसरून जावे ,
असे तुझ्यात गुंतून जावे ,
कि स्वतःचेच काय , 
संपूर्ण जगाचे भान हरवून जावे !
मनस्वी फक्त तुझेच बनून राहावे ,
तुझीच म्हणून ओळखली जावे !

लेखिका अर्चना सोनाग्रे

Comments