वय

हे वय असच असतं ,
थोडंस किचकट असतं ,
नको त्या वळणावर वळतं पाऊल ,
नको तिथ मन जीव लावतं ,
असं खूप काही नकोसं करणारं ,
अन ते करवून घेणारं असतं ,
काही नाही कळत , 
कळलं तरीही नाही वळत ,
असच सार काही ह्या किशोर वयात असतं ,
तरीही हेच वय आपल्याला सर्वात प्रिय असतं ........


कवि - अर्चना सोनाग्रे 

Comments