आज एक पावसाची सर
आज एक पावसाची सर , माझ्या गावी आली .
एकट्यात गाठून मला , चिंब चिंब भिजवून गेली .
कशी कुणास ठाऊक , मला तुझी आठवण झाली .
तशी मी लाजून स्वतःशीच हसली .
हळूच जाऊन पुन्हा , त्या सरीला बिलगली .
तुझ्या आठवणींच्या पावसात न्हाऊन निघाली .
लेखिका
अर्चना सोनाग्रे
Comments
Post a Comment