चारोळी
तुला नाही कल्पना आपलं गुपित फुटल्याची ,
साऱ्या जगात हीच चर्चा चालत असल्याची .
तू तर आहेस आपल्याच जगात मस्त ,
विचार दिसतोय तुझा ,
सर्व पुस्तकांना करायचा फस्त !
तुझे प्रेम नाही ओळखत ,
तो मूर्ख आहे ,
जीवनाच्या एका नियमापासून अजाण आहे ,
माहित नाही त्याला ,
नशिबानेच जीव लावणारं मिळतं कोणी ,
म्हणून जो मिळेल त्याला काबुल करायचे ,
उद्या पाहिजे म्हटल्यावरही नाही मिळाले ,
तर कुणाला सांगायचे ................
त्याने मला काही सांगायच्या लायकीचे समजले नाही ,
माझ्यावर भरोसा त्याला ठेवावासा वाटला नाही ,
यापेक्षाही वाईट काय होईल ,
कि मी पन त्याच्या मनाची व्यथा जाणली नाही .............
लेखिका - अर्चना सोनाग्रे
Comments
Post a Comment