मैत्री
गुंतती हृदये ना समजे कसे ,
जीवनाच्या वाटेवर सदा सोबत तूच दिसे ,
नसता जवळ तू सखे , का भास मज तुझे होत असे ,
वाटे जसे इथेच तू माझी सावली असे ,
मला प्रकाश देणारी सूर्य किरण तुझ्यात वसे ,
थंडाव्याने मला न्हाऊ घालणारी चांदणी तूच गडे ,
गारव्याने मला स्पर्शून जाणारी लहर तूच गडे ,
माझ्या अंतकरणाला भिडणारी तुझी साद असे ,
म्हणून मैत्रीचे नाते आपल्यात असे ,
श्रावणाचे पावसाशी जसे .................कवियत्री - अर्चना सोनाग्रे
Comments
Post a Comment