अशी ग सुरेख राखी

अशी ग सुरेख राखी मी दादाच्या मनगटी बांधील ,
प्रेमाच्या धाग्याने त्याला विश्वासात घेईल .
अशी ग सुरेख राखी मी दादाच्या मनगटी बांधील ,

रक्षणाच्या वचनाने वचनबद्ध करेल ,
ममतेची पांघरून त्याच्यावर घालेल ,
भाऊ बहिणीच्या नात्याला मैत्रीची झाल्लर लावेल ,
अशी ग सुरेख राखी मी दादाच्या मनगटी बांधील ,

वडिलधाऱ्यांच्या  जागी त्याला बघेल ,
नेहमीच चालतो आमचा खोडकरपणा ,
आज त्याला थोडा लगाम घालेल ,
अशी ग सुरेख राखी मी दादाच्या मनगटी बांधील ,

सर्वांच्या आशीर्वादाने दादाला तिलक करेल ,
कधी नव्हे ती आज त्याची थोडी स्तुती करेल ,
अन मग ओवाळून त्याला छानसा ऐवज मिळवेल .
अशी ग सुरेख राखी मी दादाच्या मनगटी बांधील ,
 
कवयित्री - अर्चना सोनाग्रे

Comments