देशप्रेमाला उधान आणू !!!
लागलाय ऑगस्ट चला तयारी करूया ,
पंधरा ऑगस्ट ला देशप्रेमाचे उधान आणूया ,
फडकवू झेंडे , फिरू गल्लो गल्ली
घोषणा करत फिरू बाईकच्या संगी ,
आता आपले देश प्रेम दाखवूनच देऊ ,
एका दिवसात जितके होईल तितके नारे लाऊ !
फुटाळा तलावावर बाईक परेड काढू ,
नवनवीन स्टंट करून मुलींना रिझवू ,
एका तरी मुलीला जरूर पटवू ,
आता आपले देश प्रेम दाखवूनच देऊ ,
एका दिवसात जितके होईल तितके नारे लाऊ !
सोळा ऑगस्ट ला परत आपापल्या कामात गुंतू ,
काहीही हो देशाचे आपल्याला काय करायचे ?
आपण पंधरा ऑगस्ट अन सव्वीस जानेवारीलाच सारे प्रेम दाखवू .
एका दिवसात जितके होईल तितके नारे लाऊ !
एका दिवसात जितके होईल तितके नारे लाऊ !
मग कोणी गरीब भुकेने मेला तर मरु दे ,
आपण आपल्या दोन वेळेच्या जेवणाचा विचार करू ,
एका दिवसात जितके होईल तितके नारे लाऊ !
भ्रष्ट्राचाराला विरोध करायचा ठेका ,
घेतलाय ना रामदेवबाबा अन आण्णा हजारेंनी ,
मग आपण कशाला ह्यात उगाच वेळ घालवू ,
मिळतील तेव्हढे पैसे टेबलाखालून घेऊन घेऊ .
एका दिवसात जितके होईल तितके नारे लाऊ !
उगीच कशाला करावी उठाठेव ,
आपण आपले जीवन शांततेत घालवू ,
अन मुलांनाही हीच शिकवण देऊ ,
आता आपले देश प्रेम दाखवूनच देऊ ,
एका दिवसात जितके होईल तितके नारे लाऊ !!!!!!
कवयित्री - अर्चना सोनाग्रे
Comments
Post a Comment