आदरांजली अन्नांच्या चरणी


भाग - पहिला 
एक वादळ आहात आपण ,
झंझावाताचे सोबती आहात आपण ,
असे असूनही इतके शांत कसे आपण !
अग्नीचा दाह वसतो शरीरात आपल्या ,
एक धगधगता ज्वालामुखी आपण ,
तरीही विस्मयकारी शीत गुणाचे धनी आहात आपण !
अहिंसेची मशाल हाती घेऊन ,
एका नवीन क्रांतीची सुरवात केली आपण ,
चिरतरुण नवयुवान आहात आपण ,
देवाघरचे देवदूत आहात आपण ,
मृत्यूचे बोट पकडून चालत आहात ,
तरीही ओठांवरचे हसू तसेच आहे ,
जशी फुलांची प्रसन्नता आपल्याला लाभली आहे ,
मन भयाच्या पलीकडे जाऊन पोहोचले आपले ,
निर्भयतेचा पुतळा आपण ,
क्रमश ..............................................................

Comments