आदरांजली अन्नांच्या चरणी
भाग - तिसरा
भ्रष्ट्राचार विरोधी आंदोलन छेडले आपण ,
आम्हाला जीवनदान दिले आपण ,
तरुणांचा जनसागर उसळून आला ,
आपल्याला समर्थन देऊ लागला ,
देशप्रेमाचा खरा भाव मला त्यांच्या डोळ्यात दिसला ,
भारतीय तरुणाला आपण अधिक तरुण केले ,
हे पाहताच पापण्या पाणावल्या ,
अश्रुंचे ओघळ गालांवर आले ,
परी डोळ्यातील चमक वाढली ,
ओठांवर स्मित स्फुटून आले ,
मनोमन आपले आभारी झाले ,
जन्मोजन्मीची ऋणी झाले ,
आता मज चिंता नाही भविष्याची ,
कारण माझा वर्तमान काळ आपण ,
मंगलमय अन प्रेरणादायी घडविला ,
आणखी काय बोलू आपल्याबद्दल ,
शब्दकोश संपला माझा ,
विचार बुद्धीही क्षीणली माझी ,
फक्त एकाच प्रार्थना आहे ,
असेच आमच्या पाठीशी राहा ,
आपला हात आमच्या डोक्यावर असू द्या ,
चिरायू तुम्ही व्हा .............!
कवियत्री - अर्चना सोनाग्रे
Comments
Post a Comment