प्रत्येक कवितेत आपलेच नाव येतेय

आज काय झाले कळत नाही ,
अन्नांशिवाय आणखी काहीच सुचत नाही ,
अन्ना म्हणताच शब्द जुळायला लागतात ,
त्यांची माळ गुंफून ओळी तयार होतात .
बहुतेक त्यांचे कार्य अंतकरणाला भिड्लेय ,
ज्याची वाट होती आतापर्यंत ,
तेच त्यांनी केले .
मनातला संताप आता ,
बाहेर काढू शकतो आम्ही ,
सरकारला जबाब विचारू शकतो आम्ही ,
टवाळखोऱ्या करतांना तरुणांना बघितले होते ,
शिट्या मारून छेड काढतांना पाहून ,
कितीतरी शेरे मारले होते ,
'' भारतीय तरुण असाच वाया जाणार आहे ,
ह्याचे भविष्य चाकरीतच हरवणार आहे .''
पण आज ह्याच तरुणांना भ्रष्ट्राचाराविरुध्द लढतांना बघून ,
मन गद गदून आले ,
डोळ्यांच्या कडा भरून आल्या ,
अश्रुंचे ओघळ वाहताहेत ,
पण अंतकरण तृप्त झाले .
येणारे दिवस सुखाचे राहतील ,
माझी मुलं निर्मळ वातावरणात वाढतील ,
सुंदर असे जीवन मला दिसतेय ,
भविष्याचे स्वप्न मी आताच रंगवतेय ,
हे सारे अन्ना आपल्यामुळेच घडतेय ,
म्हणून तर प्रत्येक कवितेत आपलेच नाव येतेय ..... 

कवयित्री - अर्चना सोनाग्रे

Comments