आणखी कुठे टेकवू माथा


आणखी कुठे टेकवू माथा ,

मंदिर मश्चीद सर्वच झाल्या ,

ईश्वर अल्ला इसाई सर्वांचा केला धावा ,

अण्णा , तुम्हाला जपण्यासाठी हा सारा आटापिटा ,
कारण तुम्ही अमूल्य आहात ,
जगाच्या पाठीवर एकमेव आहात ,
दिसता एकटे तरी असंख्य आहात ,
प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहात ,
अण्णा आपण आमच्या साठी देवदूत आहात ,
भ्रष्टाचार रुपी राक्षसाला संपवण्यासाठी ,
विष्णूने घेतलेला नववा अवतार आहात ,
विकोपाला गेलीय ह्या राक्षसाची पापं ,
निश्चिंत आहे त्याचं अंत ,
म्हणून तर सारेच पेटून उठले ,
आपल्या नेतृत्वाखाली एकत्र आले .
अण्णा तुम्ही आम्हाला जागृत बनवले .
आपले आरोग्य निर्मळ राहो ,
आपण सदा सुदृढ राहो .......

कवयित्री - अर्चना सोनाग्रे

Comments