अण्णांच्या नावाचा झाला गजर


अण्णांच्या नावाचा झाला गजर , 
अण्णांच्या नावाचा झाला गजर ,
लहान , थोर - मोठे आले रस्त्यावर ,
कुणा न कळे लोकपाल ,
कुणा न कळे काय ते संविधान ,
पण अन्ना टीमने सर्व माहिती आम्हाला पुरवली ,
तेव्हा एकच कळून चुकले ,
अण्णांची सोबत न्याय देईल ,
भ्रष्टाचाराला मात देईल ,
बिगडलेल्यांना लावेल योग्य वळन ,
जे काही जीवन आपण जगत आलो ,
नको ते सारे सोसत आलो ,
ते आपल्या पुढल्या पिढीला बघावे लागणार नाही ,
भारत म्हणजे , भिकाऱ्यांचा , दरिद्रांचा देश ,
असे कुणी परकीय म्हणणार नाही ,
पुन्हा कुणी तरुण परदेशात स्थायी होणार नाही ,


कवयित्री - अर्चना सोनाग्रे

मंत्र्यांच्या हातातील बाहुलं आपण राहणार नाही.........

Comments