सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मि आली
सोनियाच्या पावलांनी माझी माय आली ,
चांदीची पैंजण लेऊन आली ,
सनई चौघड्यांचा नाद घेऊन आली ,
आली ग आली माझी महालक्ष्मि आली ...
भरभराट तिने मला अशी दिली ,
हजारोनी उठली पंगत माझिया दरी ,
तरीही निपूर कधी मज ना आली ,
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मि आली ...
धनसंपत्ती तर आहेच ,
कृपेने तिच्या आत्म शांतीहि लाभली ,
धन्य मी झाले , ती माझ्या अंगणी आली ,
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मि आली ...
कवयित्री - अर्चना सोनाग्रे
Comments
Post a Comment