कुणीतरी असावं आपलं आपलंस वाटणारं

कुणीतरी असावं आपलं आपलंस वाटणारं ,
रक्ताचं नातं नसलं तरी ,
आपल्याला खूप खूप जपणारं ,
कुणीतरी असावं आपलं आपलंस वाटणारं ,
आपले सारे लाड कोड पुरवणारं ,
आपल्या प्रत्येक आवडीला स्वताची आवड समजणारं ,
कुणीतरी असावं आपलं आपलंस वाटणारं ,
ज्याचे विश्व आपल्या शिवाय अधुरं असेल ,
आपण भेटताच त्याला पूर्णत्व लाभेल .
कुणीतरी असावं आपलं आपलंस वाटणारं ,
आपल्याला मनापासून आवडणारं ,
खूप खूप मधाळ अन थोडंसं कडवट असणारं ,
कुणीतरी असावं आपलं आपलंस वाटणारं ,
आपला सर्वांगानं  स्वीकार करणारा ,
आपले दोष जाणूनही आपल्यावर प्रेम करणारं ,
कुणीतरी असावं आपलं आपलंस वाटणारं ,
जो आपली प्रत्येक साद ऐकत असेल ,
सादेतील अर्थानेच तिची तीव्रता जाणणारा 
कुणीतरी असावं आपलं आपलंस वाटणारं ....


कवयित्री  - अर्चना सोनाग्रे

Comments