मन चंचल चंचल

 मन चंचल चंचल त्याला नाही काही कल ,
मन असे उडे वाऱ्यावरी , जशी भर्ती येई सागरी 
मनाला बांधु कितीही पाशात ,
लोखंडाच्या साखळ्यात ,
तरी ते वाहून जाई भावनांच्या प्रवाहात .
 मन चंचल चंचल त्याला नाही काही कल 

मनाला नाही कशाचे सुतक ,
मनाला नाही कशाचेच भान ,
विरह असतो त्याला फक्त त्याच्याच मनाचा ,
ना कळे कुणाचा धावा करी सतत ,
 मन चंचल चंचल त्याला नाही काही कल 

उन्हाळा , पावसाळा वा असो हिवाळा ,
त्यास नाही काही कर्तव्य ,
त्याचे न कुणी सगे सोयरे ,
ते फिरते उनाड ,
कधी या फुलावर , कधी वसे त्या पानावर ,
असे हे चंचल , कधी देईल धोका 
न सांगता येईल ?
 मन चंचल चंचल त्याला नाही काही कल ....................


कवयित्री - अर्चना सोनाग्रे

Comments