बदलत्या ऋतू सोबत
बदलत्या ऋतू सोबत मीही बदलत गेले ,
कधी जगायची तू सोबत आहेस म्हणून ,
आता जगतेय तू सोडून गेलास म्हणून ......
तुझे जाने अकारण नव्हते ,
पण तुला विसरनेही मज सकारण होते ,
कारणाला कारण मिळत गेले ,
अन आपल्याला दुराव्याचे पंख फुटत गेले ,
सुरेख स्वप्नांना लागावी दृष्ट ,
अशी आपली सलोख्याची घरं तुटली ,
दृढ विश्वासाचे पेरले होते बीज ,
पण ती जमीनहि वांझोटी होती ......
कवयित्री - अर्चना सोनाग्रे
Comments
Post a Comment