माझा मैना गावाकडं राईना
माझा मैना गावाकडं राईना,
ह्याला अठी करमत नायना
चव चाखली ह्यानं जवापासून शहराची ,
सारखं तठीच जाऊन पडतंय ना ,
माझा मैना गावाकडं राईना,
यड लागल्यागत पिसाट फिरतंय ना ,
हिप्पी करून शान गावभर भटकतय ना ,
राऊन राऊन अंगात आल्यागत करतंय ना ,
शहरची हवा ह्याच्या डोक्यातून जाईना ,
माझा मैना गावाकडं राईना,
गावची गंगू ह्याला भावत नायना ,
शहरी मडमचा चस्का ह्याला लागलाय ना ,
धड मराठी नाई येत ,
अन हे इंग्लिश गाण्याचा ताल धरतंय ना ,
माझा मैना गावाकडं राईना .....
[मैना - मन ]
कवयित्री - अर्चना सोनाग्रे
on demand of Manohar. aasha karte ki tula hi kavita aawadel .
ReplyDelete