ती

भावनांच्या प्रवाहात वाहणारी ती ,
विचारांच्या खोऱ्यात गोते लावणारी ती ,
खूप खूप बोलूनही अबोल वाटणारी ती ,
पहिल्या प्रेमाचा गंध न विसरलेली ती ,
अन त्याच्याच चुकांची शिक्षा भोगणारी ती ,
एका अनोळखी नात्यात बांधली गेलेली ती ,
त्या नात्याला नव देण्याच्या ओघात ,
स्वतःचे अस्तित्व मिटवून बसलेली ती ,
तरीही कोरीच कोरी असलेली ती ,
सर्वस्व पनाला लावूनही काहीच न गवसलेली ती ............

कवयित्री - अर्चना सोनाग्रे

Comments