चारोळी


*ते तुझे शब्द , ते तुझे लेख 
वाटे मज फक्त आहेत मजसाठी ,
त्या तुझ्या कविता ,
हृदयावर कोरून ठेवलेय ते तुझे भास ,
अनंताच्या आठवणी अन चांदण्यांच्या गुजगोष्टी ,
मजसाठी तुझा प्रत्येक बोल आहे विश्वास ,

*गंध न फुलाचा , गंध न पातीचा 
मला लागलाय छंद तुजसाठी जगण्याचा ,
तुझ्याच डोळ्यात मला शोधण्याचा ,
जशी मी गुंतलीय , तसे तुला गुंतवण्याचा .....

*या क्षणांना हृदयात साठवून ठेव ,
माझ्या शब्दांना थोडासा भाव दे ,
उद्या तुला छेडतील जेव्हा आठवणी माझ्या ,
हेच क्षण सोबत देतील तुला .....

 लेखिका अर्चना सोनाग्रे

Comments