पहिलं प्रेम
पहिलं प्रेम हे पहिलंच असतं ,
अन तेच शेवटचंहि बनतं .
नंतर कितीही जीव जडो कुणावर ,
कि कुणी जीव लावो आपल्याला ,
पहिल्या वहिल्या स्पर्शाची सर कशालाच येत नाही ,
जसे , हिरे माणिक पडूनही पदरी ,
टपरीवरच्या चहाची चव अधिक सरस वाटते ,
जसे चार चाकित बसूनही ,
चिखलाने माखलेल्या रस्त्यावर चालण्याची मौज कमी होत नाही .......कवयित्री - अर्चना सोनाग्रे
Comments
Post a Comment