स्वप्नांच्या पलीकडे

स्वप्नांच्या पलीकडे मला जायचे होते ,
उंच आकाशात पाखरांसोबत उडायचे होते ,
ढगांसोबत लपंडाव खेळायचे होते ,
परीदेशात एक दिवस जायचे होते ,
माझ्या राजकुमाराला तेथे शोधायचे होते ,
त्याच्या सोबत आयुष्य रंगवायचे होते ,
परि दैवाचा फेरा ऐसा डाव मांडुनी गेला ,
स्वप्नांच्या अलीकडेही मज रडवून गेला ,
पाखरांसोबत उडणे तर दूर ,
माझे भरारी घेणारे मन हि हिरावून गेला ,
असा लपंडाव खेळला तो मज सोबत ,
कि परीदेशाचा रस्ताही नरक वाटू लागला ,
राजकुमार तर मिळाला ,
परि आयुष्य तो रंगहीन करून गेला ......


कवयित्री - अर्चना सोनाग्रे

Comments