मरून पडल्या इच्छा सर्व
मरून पडल्या इच्छा सर्व ,
गळून पडली पाती न पाती ,
आता मज जवळ काय राहिले ,
तपस्येचीहि झाली माती ...
अन तुम्ही म्हणता ,
'' घे हसून एकदा स्वतः साठी '',
मनी पुरवूनी दुखे अनंत ,
चेहरा ठेवावा फुलवुनी प्रसन्न ,
कडवट बिजांनाही रोवुनी माझ्यात ,
मी पिकवली गोड फळे ...
करून सरून सारे ,
माझे हात कोरे ते कोरेच ...
मग मी रसिक होऊ कशी ?
स्वप्नांना भरारी देऊ कशी ?
कवयित्री - अर्चना सोनाग्रे
Comments
Post a Comment