दिवाळीचा पावन उत्सव आला
दिवाळीचा पावन उत्सव आला ,
कवयित्री - अर्चना सोनाग्रे
चहूकडे खाद्य - पदार्थांचा सुगंध दरवळला ,
दिव्यांच्या वरातींनी घराच्या मुन्डाली झगमगल्या ,
पटाख्यांच्या आवाजाने नगरी दुमदुमल्या ,
दिवाळीचा पावन उत्सव आला ...
धूप अगरबत्ती लावता प्रत्येक क्षण मंगलमय झाला ...
अभ्यंग स्नानाने शरीराचा रोग पळता झाला ...
दारोदारी सडा शिंपिला ,
अन रांगोळ्यांचा थवा बसविला ...
आंब्याच्या पानांची तोरणं ,
झेन्डूच्या फुलांच्या माळा ,
लगबगीने दाराच्या कमानीवर चढल्या ..
प्रत्येकाला बघून आनंदी ,
त्याही गद्गद झाल्या ...
नव्या कपड्यांच्या , नव्या साजाच्या ,
खरेदीला उधान आले ...
लहान मोठे , थोर सारे ,
घेताहेत आस्वाद जगण्याचा ...
हा गेला तो आला , इथे हे तिथे ते झाले ,
हे आहे रोजचेच रडगाणे ,
दिव्यांच्या प्रकाशात विसरून सारे ,
चला चेहऱ्यावर फुलवू तारे .......
दिवाळीचा पावन उत्सव आला.....
Comments
Post a Comment