आज पुन्हा पहल मी केली

आज पुन्हा पहल मी केली,
आज पुन्हा पुढचं पाऊल मी चालली,
ह्याचा गैर अर्थ तू काढू नकोस,
मनातली कथा मनात ठेवता आली नाही,
काळजातली तळमळ लपवता आली नाही,
म्हणून सारा घोळ झाला,
नाही नाही म्हणता,
सारा किस्सा सर्वांना माहित झाला,
मग तुझ्याकडूनच का हि लपवा-लपवी,
म्हणून स्वतःच सारी हकीकत सांगितली..........

कवयित्री-अर्चना सोनाग्रे

Comments