मन उदास झाले
मन उदास झाले जेव्हा तू बोललास ,
मन उदास झाले जेव्हा तू अबोल झालास ,
कळून सर्व तुला, काहीच वळले नाहीं,
इतके समजावूनही काहीच उमजले नाहीं,
मी तर आहेच अशी ,
वाऱ्यावर भिरभिरणारी,
भिंग्र्या घालून पायी फिरणारी,
पण शेवटी तुझ्या जवळच येऊन थांबणारी,
तुझ्या बाहुपाशात विसावणारी....
तरीही तू परका वाटतोस,
कधी खूप जवळ तर कधी खूप दूर भासतोस...
शब्द बाणांचा वार करतोस,
डोळ्यातील पाण्याला मगरीचे अश्रू म्हणतोस,
अन प्रेमाची अवहेलना करतोस,
स्वतःच बोल,बोल कडवे बोलून ,
मग अबोल होतोस, अबोल होतोस...........
कवयित्री-अर्चना सोनाग्रे
Comments
Post a Comment