कधी कधी असा हरवून जातो तुझ्यात
कधी कधी असा हरवून जातो तुझ्यात,
निरागसतेत तुझ्या झोकून देतो स्वतःला ,
कधी कधी असा हरवून जातो तुझ्यात,
तुझ्यात काय वेगळे शोधात फिरतो मी,
तुझाच विचार करीत बसतो मी,
कधीही एका ठिकाणी न राहणारा,
आजकाल एकाच जागी बसून असतो मी,
कधी कधी असा हरवून जातो तुझ्यात,
विचारांनी तुझ्या हसतो स्वतःशीच ,
काही का होईना ,
आजकाल बोलत असतो स्वतःशीच ,
कधी कधी असा हरवून जातो तुझ्यात,
संध्याकाळची सावली येताच अंगावरी ,
वाटतं तुझ्या केसांची लाट येतेय मजवरी,
त्या लाटेत भिजून जावसं वाटतं,
अन सदैव तेथेच राहावसं वाटतं,
कधी कधी असा हरवून जातो तुझ्यात....
अर्चना सोनाग्रे
निरागसतेत तुझ्या झोकून देतो स्वतःला ,
कधी कधी असा हरवून जातो तुझ्यात,
तुझ्यात काय वेगळे शोधात फिरतो मी,
तुझाच विचार करीत बसतो मी,
कधीही एका ठिकाणी न राहणारा,
आजकाल एकाच जागी बसून असतो मी,
कधी कधी असा हरवून जातो तुझ्यात,
विचारांनी तुझ्या हसतो स्वतःशीच ,
काही का होईना ,
आजकाल बोलत असतो स्वतःशीच ,
कधी कधी असा हरवून जातो तुझ्यात,
संध्याकाळची सावली येताच अंगावरी ,
वाटतं तुझ्या केसांची लाट येतेय मजवरी,
त्या लाटेत भिजून जावसं वाटतं,
अन सदैव तेथेच राहावसं वाटतं,
कधी कधी असा हरवून जातो तुझ्यात....
अर्चना सोनाग्रे
Comments
Post a Comment