ऐश्वर्या बाळंतीन झाली
अरे ऐश्वर्या गर्भवती झाली अन तिने मुलीला जन्मही दिला. मग आता काय भारतातील इतर महिला निपुत्रिक राहल्या तरी चालतील, असा श्वास सोडला सर्वांनी काल. सदान कदा एकच प्रश्न ऐश्वर्याला बाळ कधी होईल? बिग बी च्या घरी लहान पाहुणा कधी येईल? ऐश्वर्या गर्भवती होणार कि नाही? अन जेव्हा झाली तेव्हा तिला मुलगा होईल कि मुलगी? जुळे होईल कि तिळे? चला तर [एकदाची] ऐश्वर्या बच्चन बाळंतीन झाली. नाहीतर तिच्या बाळंतपनाविषयी आपल्याला आणखी काय काय ऐकावे लागले असते देव जाने. मिडिया वाल्यांनी किती शेरे मारले होते,'अमिताभला नातू झाला म्हणजे सोन्याचे भाव उतरणार' हे ऐकले तेव्हापासून आमच्या शेजारील काकूंनी ठरवले होते कि ऐश्वर्याचे बाळंतपण झाल्यावरच सोनं घेणार. पण अमिताभला नातीन झाली अन सोन्याचे भाव काही उतरले नाही अन बिचाऱ्या आमच्या काकूंची स्वप्न मनीच राहिली. म्हणजे 'दिलके आरमा आंसूओमें बह गये|' हे झालं आमच्या काकूंचं पण काहींनी तर असाही दावा केला होता कि ऐश्वर्याला जुळी होतील. त्यामुळे व्यापारी मंडळी खुश झाली असेल कि बिग बी च्या घरी दोन नवीन आलेल्या तान्हुल्यांसाठी सोन्यापासून ते कपड्यांपर्यंत सर्व गोष्टींची दुहेरी खरेदी केल्या जाईल. पण हेही ,'गई भैंस पाणी में'. त्यात पैज लावणाऱ्यांची खूप धूम झाली. कारण मिडियाची जवळ जवळ सर्वच भाकितं खोटी ठरली. आणि सट्टेबाजांची कमाई झाली. असो, आपल्याला काय त्याचे? आपले काम नवीन आलेल्या तान्हुल्याला आशीर्वाद देणे एवढेच आहे.
अर्चना सोनाग्रे
अर्चना सोनाग्रे
Comments
Post a Comment