माहित नाही पुन्हा



माहित नाही पुन्हा तू कधी भेटशील असा?
माहित नाही पुन्हा तू कधी जवळ येऊन बसशील असा?
माहित नाही पुन्हा कधी संध्याकाळ मिळेल अशी मोकळी आपल्याला?
माहित नाही पुन्हा कधी असा वेळ मिळेल तुझ्याशी बोलायला?
तेव्हा आज मनातील सर्व बोल बोलुदे,
व्यथेच्या कथा आज तू ऐकून घे,
माझ्या काही कविता तू ऐकून घे,
हास्यरसात बुडवलेली एक चारोळी ऐकून घे,
    तुझ्यासाठी शृंगारलेले माझे मन वाचून घे.

   अर्चना सोनाग्रे

Comments