रूप पाहता तुझे


रूप पाहता तुझे , वाटे पाहतच राहावे,
वाटे, या मोहनाला आपल्यात सामावून घ्यावे.
तूला ओवाळून, आरती करावी.
प्रेमाच्या पवित्र्यात अंघोळ घालावी,
अन गोड तुझे ते बोल ऐकतच बसावं,
अखंड तुझं नामस्मरण करावं.
जिथं तू तिथं तुझ्यासवे मी यावं.
परी या दुनियेपुढे कशी मी जाऊ?
आपल्या निर्मळ प्रीतीला गालबोट कशी लाऊ?
इच्छांचे काय ? त्या तर वाढतच राहतात.
माझी सात्विकता तुला मी अर्पिली,
माझी भक्ती तुझ्या चरणी मी अर्पिली.
तुझ्यात मज दिसे सारे जग,
माझ्या कान्हा, माझी मुरली..........


अर्चना सोनाग्रे

Comments

Post a Comment