तुझी आठवण

तुझी आठवण एवढीच तर एक माझी साठवण,
तुझे बोल माझ्या मनात रुजलेत खोल,
तुझी मैत्री अशीच अनमोल,
तरीही मी तिला केले बेमोल,
बोलून नको ते बोल,
त्यासाठी मज माफ तू कर,
मी प्रत्यक्ष नाही म्हणेल कधी,
पण माझे मन अजूनही तुलाच स्मरते बघ.
आपल्या मैत्रीवर गर्व करण्याचे ते क्षण,
आपल्या मैत्री विषयी अभिमानाने बोलण्याचे ते क्षण,
किती होते सुरेख, किती होते गोड?
नित निरंतर लावती मज वेड!
अशी आपली मैत्री मी का तोडली?
इतके वर्ष जपून आजच का भार झाली?
बहुतेक मला तू कधीच नाही उमगली?
बहुतेक तुला मी कधीच नाही समजली?
काहीही होवो,
पण असमंजातेचा हा खेळ पहिल्यांदाच नाही खेळलो,
आपल्यात गैरसमज आधीही झालेत,
भांडणांनी दुरावे आधीही झालेत,
पण आपण त्यांना कधीच आपल्यात थारा नाही दिला,
मैत्रीला आपल्या दुरावा नाही दिला.
मग आताच काय झाले?

लेखिका अर्चना सोनाग्रे

Comments