किती दिवस झाले तुझ्या गावी नाही आली

किती दिवस झाले तुझ्या गावी नाही आली,
मन असतांनाही त्या वाटेवर नाही आली,
किती दिवस झाले तुझ्या गावी नाही आली....

क्षणा क्षणाने वर्ष बनून छळलं,
नित मला तुझं दर्शन घडलं,
दूर असूनही जवळच वाटलं,
तरीही मी स्वतःला दाटलं,
अन त्या वाटेवर चालण्यापासून थांबवलं.
अश्या प्रयत्नांची शर्यत करून मी जगली,
किती दिवस झाले तुझ्या गावी नाही आली.........

मोह मनी झाला,
मोह तनी झाला,
कशी सांगू कसा कसा मोह झाला?
मोहाला मी बळी नाही पडली,
क्षणभर सुखासाठी नाही धडपडली,
तुला दिलेल्या वचनाला जागली,
दिलेला शब्द पाळण्यासाठीच जणू जगली,
किती दिवस झाले तुझ्या गावी नाही आली..........
कवयित्री - अर्चना सोनाग्रे

Comments