सरकार आणि सावकार

१६ ऑगस्टला अन्ना हजारे यांनी ज्याप्रकारे आपले उपोषण सुरु केले आणि जसा प्रतिसाद त्यांना मिळत गेला. तो बघून वाटलं होतं आपला देश आता महासत्ता नक्की बनणार. १०० टक्के नाही पण साठ टक्के तरी भ्रष्ट्राचार आपल्या देशात कमी होणार. कारण लवकरच जन लोकपाल बिल मंजूर होणार. कितीतरी लोकांना जन लोकपाल बिल काय आहे? त्यानं काय होईल? ते कशासाठी आहे? अन्ना हजारे कोण आहेत? केजरीवाल कोण आहेत? काहीच माहित नव्हतं. माहित होतं ते एवढंच कि जन लोकपाल बिल भ्रष्ट्राचार कमी करू शकते. म्हणून लोक 'मी अन्ना हजारे' आणि 'I AM ANNA' अशा गांधी टोप्या घालून रस्त्यावर आले. जागोजागी मंडप पडले. अगदी शंभरीच्या घरात गेलेल्या आजोबांपासून ते दोन तीन वर्षाच्या चीमुकल्यांपर्यंत सर्व ह्या मोहिमेत सहभागी झाले. गल्लोगल्ली पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. पण कुणीच हिंसाचार केला नाही. खूप शांततेत पार पडली ती मोहीम. दहा हजाराच्या वर लोक रामलीला मैदानावर अण्णांना support  करण्यासाठी जमा झाले. १६ ऑगस्ट ला सुरु झालेले उपोषण २८ ऑगस्टला संपले. अन्ना इतके दिवस उपाशी कसे राहले देव जाने. तब्बल चौदा दिवसांचा उपवास आणि तोहि ह्या वयात. कठीण! पण त्यांनी ते केले. अशी व्यक्ती आपल्या देशात आहे, आपल्या सारख्या सामन्यांसाठी जगतेय ह्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट काय असावी?
सोळा ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान जे काही झाले ते अनाकलनीय आणि ऐतिहासिक असले तरी निरर्थक वाटतेय आता. नकळत खूप आशा जोडून बसला सामान्य माणूस अन्ना हजारेंसोबत अन झाले काय! सरकार आणि सावकार काय फरक आहे ह्यात ते सरकारने दाखवून दिले. सावकार सर्व अत्याचार उघड उघड करतो, तर सरकार सर्वांना आतून दाबून बुक्क्यांचा मार देते. अन्नाचे सोळा ऑगस्टचे उपोषण सुरु झाले तेव्हापासून कितीतरी आरोप प्रत्त्यारोप त्यांच्यावर आणि त्यांच्या टीमवर करण्यात आले. केजरीवाल, किरण बेदी, सिसोदिया आणि अन्ना, कोणालाच सोडले नाही सरकारने. परिणाम २७ डिसेंबरच्या तीन दिवसीय उपोषणावर झाला. ज्या अण्णांना चौदा दिवस उपाशी राहून काहीच झालं नाही त्या अण्णांची तब्येत दोन दिवसांच्या उपोषणामुळे खराब झाली. अविश्वसनीय! पण असं झालं कारण अण्णांवर शारीरिक तानापेक्षा जास्त मानसिक तान आला. अगदी उपोषणाच्या दोन दिवसांआधी माध्यमांनी अण्णांची संघाच्या कर्त्या धर्त्या व्यक्तीबरोबर असलेली जुनी छायाचित्र प्रकाशित केली. का? स्वाभाविक आहे अण्णांना डिचवन्याचा हा सर्व कार्यक्रम आधीपासूनच ठरवलेला. नाहीतर माध्यमांना ऐन उपोषणा आधीच कस काय अन्ना संघ संबंधाची आठवण झाली? शेवटी व्हायचं तेच झालं, मुंबईचं उपोषण निरुपयोगी ठरलं. सरकारच्या मनाजोगतं झालं. सावकार रुपी सरकारने पुन्हा एकदा जे हवं होतं ते मिळवलं. 

Comments