नववर्षाची नवं आखणी
नववर्षाची नवं आखणी करू,
मागील वर्षी बिघडलेली कामं, नव्याने सुरु करू.
नववर्षाची नवं आखणी करू,
मागील वर्षी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही ह्याची काळजी घेऊ.
नववर्षाची नवं आखणी करू,
मागील वर्षी ठरवलेलं नाही केलं, ते जाऊद्या.
पण या वर्षी शब्दा शब्दाला मन देऊ,
अन अक्षर अक्षर खरं करू.
नववर्षाची नवं आखणी करू,
बघता बघता नवं वर्षाचा तिसरा दिवसही येऊन ठेपला,
आपली आकारणी जरा घट्ट करू,
विचारांना आतातरी कृतीची जोड देऊ,
नावानं नाही कर्मानं पुढे जाऊ,
आपली एक ओळख ह्या वर्षी निर्माण करूनच पुढील वर्षात पाय ठेऊ.
नववर्षाची नवं आखणी करू.
ह्या सर्व गडबडीत आपल्या प्रेमालाही जागा देऊ.
परिवाराच्या सोबतीनं क्षण क्षण आनंदात विलीन करू,
नित स्मित, नित हास्य लहर निर्माण करू.
नवं दिवसाला नवं व्यक्तीला आपलं करू.
जगण्याचा अर्थ त्यालाही समजावून सांगू.
नववर्षाची नवं आखणी करू............

Comments
Post a Comment