मी धनगर - २ [खंडेराया]
'खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली,
नवरी नटली , सुपारी फुटली!'
हे गाणं तर ऐकलंच असेल सर्वांनी. अहो काही दिवसांपूर्वी जेव्हा animated baby वर हे गाणं rimix करण्यात आलं तेव्हा तर धूम केली होती या गाण्यानं. खरं तर हे गाणं म्हणजे एक लोक-गीत आहे. मुख्यता लग्नकार्यात कुलदैवताला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ हा प्रकार करण्यात येतो आणि त्यात अश्या प्रकारचे लोक गीत गायले जाते व इतर गोंधळी त्या गीताच्या तालावर गोंधळ घालतात म्हणजेच नाचतात. हे गीत ऐकताना जेवढी मजा येते त्याच्या दुप्पट तिप्पट मजा गोंधळीन्ना ह्या गीतावर गोंधळ घालतांना बघण्यात येते. पण हे गीत असेच लिहिले गेले नाही तर त्या मागेही खूप मोठे कारण आहे. धनगरांमध्ये मुख्य करून जास्तीत जास्त लोकांचे कुलदैवत हे 'शिव' अवतार समजले जाणारे 'खंडोबा' आणि त्यांची पत्नी 'पार्वती' अवतार समजली जाणारी 'बनाई' हे आहेत. खंडोबाचे सुंदर असे मंदिर जेजुरी येथे आहे. तर आपल्या घरातील मंगल कार्य विघ्नरहित पार पडावे म्हणून कुलदेवाचे आणि कुलदेवीचे आव्हान करण्यासाठी 'खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली , सुपारी फुटली!' असे हे गीत लिहिण्यात आले आहे असे मला वाटते. नाही मला पक्का विश्वास आहे. म्हणजे गोंधळाचा गोंधळहि होतो आणि देवाचे नामस्मरणहि होते.
आणखी एक मला वाटतं हे गीत आपल्या धनगरांपैकीच कुणीतरी लिहिले असावे. कारण खंडोबाची पत्नी बनाई [बानू] हि धनगराची मुलगी होती. आणि इथे तिचेच नाव घेण्यात आले आहे. जेव्हा कि खंडोबारायला तर कितीतरी समाजाच्या, वेगवेगळ्या जाती, धर्म, पंतातील अनेक बायका होत्या. असे म्हटले जाते कि त्या सर्व बायका ह्या देवाच्या आणि माणसांमधील एक 'दुवा' होत्या [हे मुद्दाम सांगितले नाहीतर पुरुष मंडळी म्हणेल खंडोबारायांनी इतक्या बायका केल्या, मला दोन तरी करू द्या.] त्यातील म्हाळसा आणि बनाई[बानू] ह्या दोन मुख्य! म्हाळसाचे रीतीरिवाजांनी लग्न होते तर बनाईचा देवासोबत [खंडोबा सोबत] 'प्रेमविवाह' होतो. म्हणून बनाईला पार्वतीचा अवतार म्हटले जाते.
असं आहे ते! बापरे किती मोठी कथा एका गाण्यामागे!
इतकी माहिती मिळूनही मला अजूनही अज्ञान असल्यासारखं वाटतं. तेव्हा काही माहिती चुकली असेल आणि आपल्याला ती माहित असेल तर प्लीज मला सांगावी. धन्यवाद!
लोकदैवते आणि धनगर समाज, संस्कृती या विषयावरील डॉ. रा. चि. ढेरे यांचे लिखाण वाचावे.
ReplyDelete