प्रजासत्ताक कि लोकसत्ताक!
परवाच आपल्याकडे २६ जानेवारी हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून धुमधामित साजरा करण्यात आला. जल्लोषाला कुठेच कमी नव्हती. पण मला एक प्रश्न पडतो कि जिथे राजाच नाही तिथे प्रजा कशी येईल? आपल्या देशात तर लोकशाही राज्य करते ना [असं म्हणतात बाकी राजकारणी काही ती चालवू देत नाही ते वेगळं.] आणि लोकांचा अध्यक्ष म्हणून आपले राष्ट्राध्याक्ष्य आपण दर पाच वर्षांनी निवडून देतो. भारतीय संविधानाच्या प्रस्तावानेतही हेच नमूद केलेले आहे कि आपला देश हा लोकांकडून, लोकांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी चालवण्यात येतो. कळलं का आपलं कुठं चुकतंय ते? आपण वर्षानुवर्ष तेच करतो जे आपल्या मोठ्यांनी केलं. आपण वर्षानुवर्षे जे चालत आलं तेच चालू देतो, जे आपल्या मोठ्यांनी शिकवलं तेच करतो बोलतो. काहीच असे असतात जे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या मेंदूने विचार करतात आणि ठरवतात कि नक्की आपल्याला जे शिकवण्यात आले ते योग्य आहे कि त्याला सुधारणेची गरज आहे? नाव काहीतरी वेगळे, पोरगी लिहिते काही वेगळे! नाही हो असं काहीच नाही. मला हेच म्हणायचं आहे कि आपण नक्की प्रजासत्ताक राष्ट्रात जगतोय कि लोकसत्ताक? आता प्लीज 'दोन्ही' एकंच आहे असं म्हणू नका. कारण दोन्ही शब्दात खूप फरक आहे आणि तो मी परवा प्रथमच आमच्या बोधनकर सरांच्या शब्दातून जाणला. प्रजासत्ताक म्हणजे आतापर्यंत जिथं राजेशाही चालत आलीय तिथं प्रजेशाही चालतेय. म्हणजे राजाने राज्याचा पूर्ण कारभार प्रजेच्या हाती सोपवला आहे. तर लोकसत्ताक म्हणजे हुकुमशाही किंवा गुलामगिरी [जी इंग्रजाच्या काळात आपल्या पंजोबा, आजोबांनी अनुभवली] जाऊन लोकांनीच आपला प्रतिनिधी निवडून त्याला राज्याचा कारभार चालवायला मदत करणं. बरोबर ना? परवा आपला ६३ वा गणतंत्र म्हणा किंवा लोकसत्ताक [जो कि फक्त म्हणायलाच उरलाय] दिन खूप आनंदात पार पडला. एखाद्या उत्सवासारखाच. प्रत्येक शहरी, गावोगावी, वस्ती, शाळेत, गल्लोगल्ली परेड काढण्यात आली. पण इतक्या वर्षानंतरही आपली पोलीस यंत्रणा तशीच कार्य करतेय जशी कि ती ६३ वर्षांपूर्वी करायची. गम्मत म्हणजे ज्या इंग्लंड आणि अमेरिकेकडून आपण पोलिसांची नीती घेतली होती त्यंनी वेळोवेळी आतापर्यंत कितीतरी वेळा त्यांच्या पोलीस यंत्रणेत बदल घडवून आणला आणि आपण जैसे थे. कारण इथे काळाची गरज समजून घेऊन बदल घडवून आणायला वेळ कुणाला आहे. जी भ्रष्ट्राचाराची प्रकरणं उघडकीस येतात त्यांनाच तर न्याय देणं होत नाही, मग नाविन्यता आणायला तर दुसरा जन्मच घ्यावा लागेल. एकूण वाटतं एका तर्हेनं प्रजासत्ताक पण ठीकच आहे. म्हणजे मंत्री मंडळ राजा आणि आपण त्यांची प्रजा! अशी राजेशाही सध्या चालत आहे. तेव्हा द्या पूर्णविराम लोकसत्ताकला आणि स्वीकारा प्रजासत्ताकला.
Comments
Post a Comment