मी धनगर- 3 [देवी अहिल्याबाई!]

कधी कधी तर मला वाटतं कि वयाच्या तेरा चौदाव्या वर्षापर्यंत नक्कीच मी मंदबुद्धी होती. ना अभ्यासात हुशार ना खेळण्यात चपळ किंवा इतर कोणत्याही गोष्टीत नगण्यच होतो आम्ही. हे सर्व आता बोलायचं कारण असं कि मला दहावीत जाईपर्यंत असंच वाटायचं कि 'राणी लक्ष्मिबाई' आणि 'अहिल्यादेवी' एकंच आहेत. आता तर तुम्हीपण म्हणाल मेंदूत काहीतरी गडबड नक्की होती. पण मला त्या दोघी एकंच वाटत असल्याची कारणंहि भरपूर होती. म्हणजे दोघींमधील साम्य, जसं दोघीही सामान्य कुटुंबातील असून त्यांचा विवाह राजघराण्यात झाला. दोघीही लहान असतांनाच त्यांच्यातील निडर, निर्भय, तरीहि मायाळू, लाघवी वृत्तीनं त्यांनी राजघराण्यातील व्यक्तींना प्रभावित केलं. त्यांची न्याय प्रीयता, निर्णयक्षमता! आणि मुख्य म्हणजे दोघींनाही पुढे आपल्या राज्याचा राज्य कारभार स्वतः बघावा लागला. हो फरकही पुष्कळ आहे त्यांच्यात. जसं देवी अहिल्याबाई म्हणताच आपल्यासमोर येते एक शालीन मूर्ती,डोक्यावर पदर, कपाळावर चंदनाचा टीका, हातात महादेवाची पिंड! तर दुसरीकडे राणी लक्ष्मिबाई म्हणताच आठवते एका स्त्रीचे मर्दानी रौद्ररूप,'एका हातात ढाल, एका हातात कट्यार, पाठीला पुत्र, घोड्यावर स्वार आणि डोळ्यात अंगार!' पण माझी बालवृत्ति [स्वतःला कसंतरी समजावच लागेल.] तो फरक बघू नाही शकली. म्हणूनच तर नववीत इतिहास ह्या विषयात घटक चाचणीत मला पंचवीस पैकी फक्त एक मार्क मिळाला होता. :-) आमचा[माझा] इतिहास खूप कच्चा होता. तो पक्का करण्यासाठी विकिपीडियाची मदत घेतली जात आहे. आणि विकिपीडिया वाचतांनाच मला एक छान माहिती मिळाली. ती हि कि २००२ मधे आपल्या 'महाराष्ट्र सरकारच्या, संस्कृती विभाग आणि पर्यटन विभागाच्या' वतीने 'देवी अहिल्याबाई' हा चित्रपट बनविण्यात आला आणि  प्रदर्शित झाला. किती खराब गोष्ट ना, दहा वर्ष झालीत हा चित्रपट प्रदर्शित होऊन आणि आपल्यातील कितीतरी लोकांना हे माहीतच नाही.  जाऊद्या काही प्रॉब्लेम नाही. मी लिंक देते. एकदा बघाच हा चित्रपट. छान वाटेल. कास्टिंग पन छान आहे. मल्लिका प्रसाद हिने अहिल्या बाईचे मुख्य पात्र पडद्यावर छान साकारले आहे. तर सदाशिव अमरापूरकरने साक्षात मल्हार राव होळकरांनाच आपल्यासमोर आणलं आहे. शबाना आझमीचा [ हर्कुबाई किंवा खान्दारणी] रोल मोठा नाही पण महत्वपूर्ण आहे. चित्रपटाची सुरुवात खूप मनोरंजक रीतीने केली आहे. पुढे दिलेल्या लिंकवर तुम्ही तो चित्रपट बघू शकता.  http://www.youtube.com/watch?v=66uovO2hy-c  धन्यवाद!

Comments

  1. अतिशय छान....धन्यवाद ही माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल.....आपल्या पुढील लिखाणास हार्दिक शुभेच्छा....

    ReplyDelete

Post a Comment