चारोळी

आज valentine day म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस! काही लोकांना ह्याच्याशी काहीच घेणं देणं नसेल पण काहींना मात्र चातकासारखी ह्या दिवसाची वाट असेल. त्यांच्यासाठी खास चारोळ्या!

* मोगऱ्याचा गंध का वाटे आज मंद,
   हवेचा गारवा का होई अखंड,
   चाल माझी आज झाली आहे संथ,
   कळेना हा कुणाचा होतोय आभास,
   थोडासा गोड थोडासा रुष्ठ !

* एकटेपणाला माझ्या चाहूल तुझी लागली,
   तहानेनं व्याकूळ चातकाला श्रावण सर भेटली,
   अतृप्त किनाऱ्याला सागर लाट मिळाली,
   जशी खूप वर्षांनी आज प्रियेशी गाठ माझी पडली!

* डोळ्यात माझ्या समावून घेईल तुला,
   पापण्यात माझ्या लपवून ठेवील तुला,
   नजरेत येवू न देईल कुणाच्या,
   अशी फक्त माझाच बनवून ठेवील तुला!  

Comments