तुझी अर्धांगिनी

जगू दे काही क्षण माझ्या मनासारखे मला.
घेऊ दे काही श्वास मनमोकळे मला.

नको करू घाई, जरा धीरानं घे,
नको करू घाई, जरा धीरानं घे,
माझ्या भावनांची चाहूल लागू दे.

मला माझं स्वातंत्र्य उपभोगू दे.
माझ्या अतृप्त इच्छांना तृप्त करू दे.


तुझ्या विश्वात शिरण्याआधी,
माझे विश्व मला परिपूर्ण करू दे .

तुझ्या स्वप्नांना पूर्ततेची झाल्लर लावण्याआधी,
माझी स्वप्न मला साकारू दे.

पुढे चालून तुझीच ओळखली जाईल मी,
आज माझी ओळख निर्माण करू दे मला.

तुझी अर्धांगिनी होन्याआधी,
माझं अर्ध जीवन, पूर्ण जगू दे मला.




अर्चना सोनाग्रे 

Comments