असं माझं सासर ग!
असं माझं सासर ग,
चांदण्यांनी भरलेलं आभाळ ग,
असं माझं सासर ग,
मोत्यांची ओंजळ ग,
असं माझं सासर ग,
वाटेने उडे सोन्याचा धूर ग,
असं माझं सासर ग,
मायेचा ओलावा केसात माळला ग,
असं माझं सासर ग,
कैरीची आंबट गोड चव ग,
असं माझं सासर ग,
हिरवागार रानमाळ ग,
असं माझं सासर ग,
खळखळ वाहते पाणी ग,
असं माझं सासर ग,
पैठणीवर नाचता मोर ग,
असं माझं सासर ग,
प्रेमाचं माहेरघर ग,
असं माझं सासर ग,
मला खूप खूप आवडतं ग...........
Comments
Post a Comment