सत्यमेव जयते

         तीन महिन्यांपूर्वी जेव्हा ह्या कार्यक्रमाची नुसती जाहिरात टीव्ही वर दाखवली जात होती तेव्हा मनात एकच प्रश्न उठत होता कि आता नेमकं मिरखान काय नवीन दाखवणार आहे? सर्वांगाने परिपूर्ण असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. त्याने केलेले सिनेमेही जरा वेगळे अन मनाला भिडणारे आहेत. तेव्हा जाहिरातीत खातांना , चहा पितांना हा नवीन काय बोलतोय काही कळत नव्हतं. तत्वज्ञानी व्यक्तींनी आपले विचारही द्यायला सुरवात केली होती. एक नक्की होते कि हा एक 'talk show ' आहे म्हणून. पण इतर talk show's  पेक्षा ह्यात काहीतर नवीन जरूर दडलंय ह्याचीही खात्री होती. शेवटी अमीर तो काहीतरी जगा वेगळंच करेल. पण त्यावर टीका करणाऱ्यांचीही कमी नव्हती. माझ्या एका पत्रकार मैत्रीनिचेच उदाहरण, ती चक्क म्हणाली कि ज्या व्यक्तीला स्वतःचे लग्न टिकवता आले नाही, ज्याला स्वतःची बायको सांभाळता आली नाही, ज्याची मुलं त्याला मानत नाहीत[यातल्या कोणत्याच गोष्टीची मला खात्री नाही.] तो इतरांचे काय भले करणार आणि कसे ? तिच्या ह्या प्रश्नाचे तेव्हा माझ्याजवळ काहीच उत्तर नव्हते. पण कदाचीत आज तिला तिचे उत्तर नक्की मिळाले असेल. प्रत्येकाला आपले एक खाजगी आयुष्य असते. त्यात आपल्या चुका आणि आपलेच खाजगीपण असते. तेथे नं डोकावानेच बरे. कारण अमीर आणि त्याच्या पहिल्या बायकोचा घटस्फोट नक्की का झाला हे काही त्याने आपल्याला सांगितले नाही. तेव्हा त्याचा विचार न करता, त्याचा विचार करावा जे अमिरने आपल्याला ह्या तेरा भागात सांगितले आहे. त्यातील मर्म जाणले तरंच आपण पुढे जाऊ शकू नाहीतर 'अमीर बरोबर कि चूक ह्या भोवऱ्यात अटकून आपलेच भले आपण विसरू.'
          सरते शेवटी एकंच सांगणे, ह्या कार्यक्रमाने झोपलेल्यांना जागी केलं, मोडून पडलेल्यांना उठून उभं केलं आणि धावणार्यांना त्यांचे शिखर गाठण्यासाठी पाठबळ दिलं. जे नितांत गरजेचं होतं. तेव्हा आपणही अभिमानाने म्हणा,''सत्यमेव जयते.......!''

Comments