valentine day

उद्या १४ फ़ेब्रुवारी , म्हणजेच valentine day . म्हणजेच प्रेमाचा दिवस ! तारुण्यात नुकतेच पदार्पण केलेल्या षोडशांना या दिवसाचे फार अप्रूप  असतं . इतरांना लाल गुलाबाची फुलं , लाल पाकीट मिळालेली पाहून आपलंहि मन सारखं झुरतं  , वाट पाहत , कि केव्हा आपल्याला हे सर्व मिळेल आणि आपणही ते सर्व तोऱ्यात मिरवू . सर्व जगाला दाखवू कि आमचंही  कुणीतरी आहे . पण ते सर्व फक्त तेवढ्यापुरतंच . एकदा वय वाढलं कि सारंच बदलतं . तो हुरूप , तो हर्ष , तो नवखेपणा सारंच संपतं . म्हणूनच सांगतेय ,

प्रत्येकाने आपल्या आयुष्यात तारुण्याची पहाट होतांना हा नवखेपणा जगायलाच हवा . 
कुणाच्या तरी प्रेमात आकंठ बुडायचा मूर्खपणा करायलाच हवा .
कारण काहीवेळा आपला हा मूर्खपणाहि खूप गोड असतो . 
शहाण्यालाही मत देतो , 
हरूनही जिंकण्याचा अनुभव घेतो . 
मनाला चीर तरुण ठेवतो , 
जीवनाला हुरूप देतो , 
जगायचं मार्ग अनुरूप करतो 


.   . Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments