निवडणूक २०१४

          उद्या सर्वांचीच प्रतीक्षा संपेल . एक नवीन सूर्य उगवेल , एक नवी पहाट होईल उद्या . असे मी नाही म्हणत निवडणूक लढलेल्या पार्ट्या म्हणत आहेत . निवडणुकीचे गाणे गात २०१३ संपले आणि निवडणुकीचा प्रत्यक्ष क्षण आला . निवडणूक २०१४ चे वारे दिशा दिशात पसरले . जोरदार प्रचार झाला . ह्या प्रचाराला महत्वाचे साधन मिळाले . ते म्हणजे आपला सर्वांचा प्रिय टि व्हि [telivision ]. जाहिरातींची जागा ह्यांच्या प्रचाराच्या गाण्यांनी आणि गोष्टींनी घेतली . 'अबकी बर मोदि सरकार ' तर जणू काही एक बिरुदावालीच झाली . काहींसाठी जोक मारायचे साधन तर काहींसाठी आपली ताकद दाखवायचे साधन झाले हे वाक्य . एका टि  व्ही  शो मध्ये आलिया भटला 'मोदींचे ' पूर्ण नाव विचारले तर म्हणे ती उत्तरली ,''अबकी बर मोदी सरकार !'. असो पण खरच गुजरातचा कायापालट करणारी हि व्यक्ती आपल्या भारत देशाचाही कायापालट करेल का ? म्हणजे जे काही दिसतेय , कानावर येतेय , बोलले जातेय त्यावरून तरी मोदीच आपले १६  पंतप्रधान होतील असे वाटतेय . पण त्यांनी जनतेला दिलेले शब्दही खूप मोठे मोठे आहेत . त्या शब्दांचा मन ठेवू शकतील ते . राजकारण आवडते खूप मला तरीही अजून बाळ आहे मी त्याबाबतीत हे मला माहित आहे .
         जाऊदे जे व्हायचे ते होईल आणि नजरेसही पडेल . मला तर ह्याचाच आनंद होतोय कि यावेळेस मतदात्याला योग्य उमेदवाराची ओळख करून देणारी बरीच साधनं उपलब्ध होती . आणि मतदात्यांची संख्याही छान होती .
Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).

Comments