पिडा

अनंत घेरावे मजभोवति
नजरा किती मजवरती

मि पुरुष जातिचा प्राणि
म्हणुन हजार पहारे मजवरति

मि पिता बंधु अन पति
गुंततो मिही नात्यांच्या जाळ्यामधि

सुर असुर सर्वत्र असतात
मग माझीच का सम्पुर्ण जात
समजलि जाते असुरि

भावनांचे खेळ मझ्या सोबतहि खेळले जातात
इज्जतिच्या बाजारात माझेहि धिंडवडे निघतात

पण अश्रु गाळायचि मला सवलत नसते
अन गाळले तर बायला ठरवले जाते.

माझ्या पायातिल काटे मलाच काढावे लागतात
कितीहि झालि पिडा तरिही हसरे बोल बोलावे लागतात

हि पिडा माझ्या अंतरी
आजवर अशीच बाळगलि उरि ...
 Writer, Archana Sonagre. M.A. (Public Admin).master of labour studies. doing phd . like to help people for living happy life.

Comments